धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन ही तत्वे स्वीकारली आहेत. प्रवेशप्रक्रियेपासून ते शाळेत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी या तत्वांना धरून असतात. सर्व स्तरातील मुलं शिक्षण घेताना दिसतात. मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या या शाळेत बालमंदिर ते दहावी पर्यंतचे वर्ग आहेत. शाळेने राज्यसरकारने दिलेला अभ्यासक्रम स्वीकारला आहे. परंतु सरकारने नेमून दिलेल्या पुस्तकांवर फक्त विसंबून न राहता अभ्यासक्रमाला पूरक गोष्टी कोणत्या करायच्या याचे नियोजन शाळा करते. यामध्ये बदलणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, भौगोलिक, वैज्ञानिक, आर्थिक, राजकीय गोष्टीवर बदल केला जातो. पाठ्यक्रम करणाऱ्या दैनंदिन गोष्टींशी जुळवून घेतला जातो. यासाठी बालमानसशास्त्राचा आधार, शिक्षणतज्ञांशी संवाद चर्चा घडवून आणल्या जातात. मुलं केंद्रबिंदू मानून मुलाला शिकण्याची संधी अनुभवातून, प्रकल्प पद्धतीतून देण्याचे कार्य शाळा करते.
हॉवर्ड गार्डनर यांच्या मते सांगीतिक, शारीरिक कौशल्ये, तार्किक गणिती प्रश्न, भाषिक प्रश्न, अवकाशीय प्रज्ञा, मानवी नाते, स्वतःला जाणण्याची प्रज्ञा, निसर्गाला जाणण्याची प्रज्ञा हे बुद्धिमत्तेचे आठ प्रकार आहेत. प्रत्येक मुलात यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त प्रज्ञा असतात. त्यामुळे प्रत्येक मुलाची विषयातील आवड या बुद्धिमत्तेच्या प्रकारानुसार असते.अशा प्रज्ञा मुलांच्या शोधून, ओळखून त्याप्रमाणे शिक्षण देण्याचा प्रयत्न शाळा करते.
मुलांच्या शिक्षणाचा दुसरा टप्पा म्हणजे प्राथमिक शिक्षण.शाळेतील सहा ते सात वयोगटासाठी प्रयोगशील, चर्चात्मक, संवादी, गतकार्यात्मक शिक्षण दिले जाते. कारण प्रयोगातील अध्ययनाचा दृष्टिकोन नवी दृष्टी सुचवितो. शिकणं आणि शिकवणं हे वर्गात संघटित कसं झाले पाहिजे हे यातून कळते. त्यासाठी वेगळ्या वर्ग रचनेची आवश्यकता असते. म्हणून शाळेने पहिल्यांदा मुलांना दिवसभर बेन्चमध्ये अडकून न ठेवताजमिनीवरील भारतीय बैठक व्यवस्था या शिक्षणप्रक्रियेसाठी स्वीकारली.
यामध्ये खरी कसोटी होती शिस्तीची. कारण मुलांना बसण्यासाठी खादीचे जमखाने(बस्करे), चप्पल ठेवण्यासाठी स्टँड दिलेले होते. या सर्वांचा वापर व्यवस्थित होईल की नाही याची शंका होती. वर्गात मुलांचे गट करून कामाची विभागणी करून दिली. त्यामुळे मुले बसण्यासाठी बस्करे व्यवस्थित घेणे, त्यांच्या घड्या घालुन ठेवणे, जेवणानंतर वर्ग स्वच्छ करणे, चप्पल स्टँड मध्ये ठेवणे या गोष्टी सरावाने करत गेली. या वर्गावर नजर टाकल्यास कुठेही गडबड गोंधळ नाही की बस्करे ,चप्पल घेण्याची घाई होताना दिसत नाही. सगळे अगदी व्यवस्थित चाललेले आहे.